About Us


कुंभश्री मोबाईल ऍपचा लोकार्पण सोहळा खालील मान्यवरांचे हस्ते संपन्न.

नोबेल कास्ट कॉम्प.प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एम. डी.उद्योजक नितीन भागवत(पुणे), सातारा येथील श्री कुंभार एंटरप्रायजेस चे संचालक उद्योजक सचिन कुंभार व M Cure Pharmasitical ltd चे संचालक नरेंद्र कुंभार यांच्या हस्ते मोबाईल ऍप लोकार्पण संपन्न.
लॅपटॉप वर कुंभश्री अँप लोकार्पण प्रसंगी डावीकडून उद्योजक इंजि. नितीनराव भागवत,नरेंद्र कुंभार, कुंभश्री संपादक इंजि.संजय राजे, उद्योजक सचिन कुंभार, इंजि.सौ सुरभी राजे, कुंभश्री संचालिका बीना राजे व जाहिरात विभाग संपादक इंजि. प्रकाश राजे.
संजय राजे यांचे जावई सॉफ्टवेअर इंजिनियर रोहित खिरोडे,सून सॉफ्टवेअर इंजिनियर सौ सुरभी राजे यांनी वेबोटीक्स टेकनॉलॉजिचे संचालक विशाल गायकवाड यांच्याशी सुमारे सहा महिने विचार विनिमय करून खुप श्रम घेऊन kumbhashree ऍप बनवला या त्रिमूर्तीचे मनःपूर्वक आभार.

खालील लिंकवर जाऊन ऍप डाऊन लोड करा
https://play.google.com/store/apps/details?id=com.kumbhashree_app

या ऍप वरून कुंभश्री मासिक पीडीएफ कॉपी वाचता येइल, वधुवर नोंदणी करता येइल.
सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व व्यावसायिक,नोकरदार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते समाज बांधवांनी आपली नोंदणी करून घ्यावी ही नोंदणी निशुल्क आहे. सर्व डेटा एकत्र झाल्या नंतर आपण आपल्या भागातील आपल्या व्यावसायिक बांधवाकडून खरेदी करू शकतो ते आपणास बांधव म्हणून काही सवलत देऊ शकतील.म्हणजे आपलाही फायदा आणि व्यवसायिकाचा सुद्धा फायदा.
एक मेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्ती प्रमाणे तुमची आमची सर्वांची प्रगती होईल.
आपल्या गरजे नुसार आपल्या भागातील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय नोकरदार, खाजगी नोकरदार, इंजिनियर,डॉक्टर असे अनेकांचे संपर्क होतील एक मेकांची कामे होतील.

पुणे - कुंभश्री डिजिटल दिवाळी अंकाला उत्तम दिवाळी अंक म्हणून प्रथम पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी. यांच्या शुभ हस्ते आणि सुप्रसिद्ध सिने अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कुंभश्री संचालिका सौ बीना संजय राजे यांनी स्वीकारला.

समस्त कुंभार समाज आणि कुंभश्री मित्र परिवार यांचे तर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन !!!

+91-9112154896 kumbhshree@gmail.com
© Kumbhashree, All Rights Reserved.
Developed By Softkey Solutions
eXTReMe Tracker